कणकवली (प्रतिनिधी) : प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणा बरोबरच चांगले शैक्षणिक साहित्य मिळाल्यास शिक्षणाची आवड निर्माण होते या साहित्याचा उपयोग करून विध्यार्थ्यानी चांगले शिक्षण घ्यावे असे प्रतिपादन माजी जि.प.अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी भिरवंडे गांधीनगर येथे केले.
कणकवली विधानसभा मतदार संघांचे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भिरवंडे आणि गांधीनगर (खलांतर) येथील प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले माजी जि.प.अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, संजना सावंत यांच्या सौजण्याने सदरचे वाटप करण्यात आले असून यावेळी गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे, भिरवंडे सोसायटीचे माजी चेअरमन संतोष सावंत शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष मंगेश सावंत श्रीकांत सावंत मुख्याध्यापक गावकर शिक्षक, विध्यार्थी व पालक ग्रामस्थ उपस्थित होते यापुढेही गावातील विध्यार्थ्यांना लागणारी मदत करण्यास आपण तयार असल्याचे संदेश सावंत यांनी सांगितले विध्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे शैक्षणिक साहित्य वाटप करून दिल्याबद्धल विध्यार्थी व पालक यांनी धन्यवाद दिले














