फोंडाघाट (प्रतिनिधी) : राजाराम मराठे कृषि महाविद्यालय फोंडाघाट कॉलेज मध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी केली. या कार्यक्रमादरम्यान सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका यांनी प्रतिमेचे पूजन करून पुष्प अर्पण केले.तसेच प्राद्यापक के. आर. भोकरे यांनी छत्रपती शाहू महाराज यांचा कार्यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमात सर्व प्राध्यापक प्राध्यापिका आणि इतर कर्मचाऱ्यांनी हिरीरीने भाग घेऊन महाराजांचा कार्यावरती भाषण केले.महाराष्ट्राच्या मातीत सामाजिक समतेची प्रतिष्ठापणा, बहुजन समाजाच्या उद्धारासाठी कार्य करणाऱ्या लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची आज 150 वी जयंती साजरी केली.या जयंतीनिमित्त मराठे कृषि महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. प्राचार्य पी. आर. संते यांनी या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.













