सह्याद्री विद्यार्थी अकादमी च्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान चे पाठबळ

फाेंडाघाट (प्रतिनिधी) : सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पुरस्कृत सह्याद्री विद्यार्थी अकादमी मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरीब व मागासवर्गीय कुटुंबातील जी मुले शालेय शिक्षण साहित्य मिळत नसल्याने शिक्षण घेण्यापासून वंचित राहत आहेत अशा मुलांना गेल्या वर्षी पासून सह्याद्री विद्यार्थी अकादमी सिंधुदुर्ग विभाग मार्फत शिक्षणाकरिता आवश्यक असणारे साहित्य या मुलांना वाटप करून कर्तव्यरूपी जबाबदारी पूर्ण करीत आहे. अशा या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वच स्तरावरून अभिनंदन करीत आहेत आणि शुभेच्छा देत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणुन सोमवार दिनांक 24 जून 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोकलभाटले ( फोंडाघाट ) येथील गरजू शालेय विद्यार्थ्यांना रद्दी महोत्सव व दानशूर व्यक्तीच्या सहाय्याने शैक्षणिक साहितत उपलब्ध करून त्याचे वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांसोबत सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभागाचे दुर्गसेवक आणि दुर्गसेविका उपस्थित होते.

error: Content is protected !!