कुडाळ तालुका शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष पदी संतोष पाटकर

जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिले नियुक्तीपत्र

कुडाळ (प्रतिनिधी) : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे कुडाळ शहरातील एकनिष्ठ कार्यकर्ते संतोष पाटकर यांची आज कुडाळ शहर अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली तशा नियुक्तीचे पत्र आज जिल्हाध्यक्ष अमित सामंत प्रांतीक सदस्य प्रसाद रेगे, यांच्या हस्ते देण्यात आले,विद्यमान शहर अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले संग्राम सावंत यांना बढती देऊन कुडाळ तालुका बेसिक कार्यकारिणी मध्ये उपाध्यक्ष पदावर नियुक्ती जिल्हाध्यक्ष अमित सामंत व प्रसाद रेगे, शिवाजी घोगळे यांनी जाहीर केली. यावेळी जिल्हा बँक संचालक आत्माराम ओटवणेकर ,जिल्हा सरचिटणीस भास्कर परब तालुका अध्यक्ष शिवाजीराव घोगळे, अल्पसंख्याक कार्याध्यक्ष नझीर शेख, तालुका उपाध्यक्ष साबा पाटकर,अशोक कांदे,नरेश उर्फ लालू पटेल, निलेश उमळकर, ओबीसी तालुका अध्यक्ष जयराम डिगसकर, अख्तर गोलंदाज देसाई यावेळी नियुक्ती पत्र घेताच संतोष पाटकर यांनी कुडाळ शहरात शरदश्चद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊनच काम करणार. तसेच लवकरच शहर कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचे सांगून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर टाकलेली संघटनात्मक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून लवकरच एक सक्षम पक्ष संघटनेची कुडाळ शहरात बांधणी करणार,असल्याचे स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!