वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले तालुक्यात बुधवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसामुळे झाडे पडून सुमारे ५५ हजारांचे नुकसान झाले आहे. गेल्या २४ तासात वेंगुर्ले तालुक्यात १०८ मिमी पावसाची नोंद झाली, अशी महिती वेंगुर्ले तहसील कार्यालयातील आपत्ती नियंत्रण विभागाकडून देण्यात आली. होडावडे-दळवीवाडी येथील जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या मालकीच्या मांगरावर आंब्याचे झाड पडून सिमेंटचे पत्रे फुटून १३ हजार रुपयांचे नुकसान झाले. दाभोली येथील गुरुनाथ कांबळी यांच्या शेतमांगरावर शेवग्याचे झाड पडून ४२ हजारांचे नुकसान झाले.