टी20 विश्वचषकाचा नवा विजेता कोण ठरणार, भारत की दक्षिण आफ्रिका?

T20 World Cup : टी 20 विश्वचषकाचा नवा विजेता कोण ठरणार, भारत की दक्षिण आफ्रिका? तुमच्या आमच्या मनातल्या या प्रश्नाचं आज बार्बाडोसच्या रणांगणात मिळणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री आठ वाजता सुरु होईल. टी20 किंवा वन डे विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ फायनलच्या मैदानात आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारताची फायनलमध्ये धडक मारण्याची तिसरी वेळ आहे. पण आयसीसी विश्वचषकाच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेनं पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी बजावली आहे. दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन्ही संघांनी यंदाच्या विश्वचषकात प्राथमिक आणि अव्वल साखळीवरही आपला ठसा उमटवला. हे दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित आहेत. त्यामुळं यंदाचा टी20 विश्वचषक कोण जिंकतो, याकडे क्रिकेटरसिकांचं लक्ष लागलं आहे. भारतानं टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारण्याची ही तिसरी वेळ आहे. 2007 साली भारतानं पाकिस्तानला हरवून टी20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. त्यानंतर 2014 सालच्या टी20 विश्वचषकात भारताला फायनलमध्ये श्रीलंकेकडून हार स्वीकारावी लागली होती. पण आयसीसीच्या स्पर्धेत मागील पाचवेळा भारतीय संघ जेव्हा जेव्हा फायनलला पोहचलाय, त्यावेली स्वप्न भंगलेय. हेच कोडं सोडवण्याची संधी आज पुन्हा एकदा भारताकडे आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!