सिंधुदुर्गात पुढील ५ दिवसांत धुवांधार पाऊस

ओराेस (प्रतिनिधी) : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढचे ५ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे. रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांसह सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश देखील हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजा मध्ये आहे. जिल्ह्यात पावसाळी शेतीच्या कामांना वेग आला असून शेतकऱ्यांना तसेच इतर नागरिकांना पुढचे ५ दिवस खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशिक्षणाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!