हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक स्पर्धेत वेंगुर्ले बसस्थानकाने प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल भाजपा व सेवा शक्ती संघर्ष संघटनेच्या वतिने ” आनंदोत्सव “

मुंबई प्रदेश झोन विभागातून मिळाला प्रथम क्रमांक

५ लाखाच्या बक्षिसास वेंगुर्ले आगार ठरले पात्र

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : राज्य परिवहन महामंडळामार्फत हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक स्पर्धेचा निकाल महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने जाहीर केला . या स्पर्धेत मुंबई प्रदेश झोन विभागातून वेंगुर्ले बस स्थानकाने ७२ गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला व यासाठी वेंगुर्ले आगार ५ लाख रुपयांच्या बक्षिसास पात्र ठरले .

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील ३१ जिल्हयातील राज्य परिवहन महामंडळाची आगारे व बसस्थानके यांची नियमित तपासणी व्हावी, प्रवाशांना सेवा व सुविधा मिळतात की नाही याबरोबर आगार व बसस्थानकांत गाड्यांसह परिसराची स्वच्छता रहाते की नाही, याची दरवर्षी पाहाणी व्हावी यादृष्टीने प्रवाशांना सोयीसुविधा देण्याच्या उद्देशाने राज्य परिवहन महामंडळामार्फत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान स्पर्धात्मक स्वरुपात राबविण्यात येत आहे.या स्पर्धेत सहभागी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ड्यातील १८ बसस्थानकांची तपासणी कोल्हापूर, सांगली व रत्नागिरी विभागाच्या समितीतर्फे झाली होती.

यामध्ये वेंगुर्ले आगाराने प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल भाजपा व सेवाशक्ती संघर्ष संघटनेच्या वतीने आगार व्यवस्थापक राहुल कुंभारे व टी.आय.विशाल देसाई यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे तोंड गोड करुन ” आनंदोत्सव ” साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई म्हणाले कि स्वच्छ सुंदर वेंगुर्ले शहराची परंपरा वेंगुर्ले आगारानेही कायम ठेवली याबद्दल विशेष अभिनंदन करत असल्याचे सांगितले .

यावेळी भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक, जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस व वसंत तांडेल, मच्छिमार सेलचे दादा केळुसकर, सरपंच संघटनेचे पपु परब, नगरसेवक प्रशांत आपटे, महीला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर, बुथ प्रमुख पुंडलिक हळदणकर, सेवा शक्ती संघर्ष संघटनेचे दाजी तळवणेकर, भरत चव्हाण, भाऊ सावळ, मनोज दाभोलकर, विनायक दाभोलकर, निखिल भाटकर, लक्ष्मण कोळेकर, चालक साहील प्रभु, आशिष खोबरेकर, उमेश राऊळ, योगेश खानोलकर, प्रकाश कराड, महादेव भगत, कर्मचारी – अर्चना कांबळी, धनश्री तांडेल, शितल ठाकुर, कल्पीता तांडेल, योगेश्री वाडकर, मॅकेनिक – गौरव रेडकर, परेश धर्णे, भरत सुकळवाडकर, शशिकांत कशाळकर, साई तुळसकर, विलास केसरकर, व्ही.व्ही.रेवंडकर, अमित कुडतरकर, अरुण मेस्त्री तसेच अनेक चालक – वाहक व मॅकेनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!