ब्यूरो न्यूज (मुंबई) : अत्यंत चुरशीच्या आणि राज्याचं लक्ष लागलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघात अखेर भाजपने बाजी मारली. कोकण पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे यांनी 2 फेरीतच 58 हजार मते मिळवली आहेत. तर काँग्रेसचे रमेश कीर दुसऱ्या क्रमांकावर राहिले. कोकण पदवीधर मतदार संघातून भाजपाचे निरंजन डावखरे विजयी झाले आहेत. पहिल्या फेरीतच निरंजन डावखरे यांना मोठं मताधिक्य मिळालं. दोन फेरीत 84 हजारांची मतमोजणी झाली. यापैकी 58 हजार मते निरंजन डावखरे यांना मिळाली आहेत. तर काँग्रेसचे रमेश कीर यांना 19 हजार मते मिळाली आहेत. तिसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू झालीये.
विधान परिषदेच्या चार जागांवर निवडणूक होत असताना सगळ्यात चुरशीची असलेली निवडणूक म्हणजे कोकण पदवीधर मतदारसंघांची निवडणूक. भाजपचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात खरी लढत होती. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 93.48 टक्के मतदान झाले आहे. 64 हजार 848 मतांपैकी वैध मते ठरवले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात 50 मतांचे गठ्ठे बांधले जातील. त्यानंतर वैध-अवैध मतांची विभागणी होणार आहे. मतांचा कोटा निश्चित झाल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी होणार आहे. याप्रमाणे कोटा पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या मतांची उलट्या क्रमाने मतमोजणी होणार आहे. सर्वात अगोदर कोटा पूर्ण करणारा उमेदवार विजयी घोषित केला जाणार आहे.