देवगड (प्रतिनिधी) : पडेल कॅन्टीन येथे दुकाने फोडून चोरी करण्यात आली. ही घटना रात्री 1 वाजता घडली. पडेल कॅन्टीन येथील स्वप्नील कोकरे यांची बेकरी दुकान, सखाराम भाऊ येंडे यांचे बांगडी आणि जनरल स्टोअर्स, तसेच एक चहा चे दुकान फोडुन चोरी करण्यात आली. लोखंडी शिगेची पहार वापरून सदर दुकानांची कुलुपे तोडून चोरट्याने दुकानात प्रवेश केला. बेकरी मध्ये सुमारे 3000 रुपये, येंडे यांच्या दुकानांमधून सुमारे 3000 तर चहा दुकानातून 1500 रुपये चोरट्यांच्या हाती लागली. विजयदुर्गचे पोलीस अधिकारी आपल्या टीम सोबत अधिक तपास करीत आहेत. श्वानपथक तसेच हस्तरेषा अभ्यासक पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. खाजगी दुकानांच्या CCTV फुटेजमध्ये एकच चोरटा दिसत असून त्याने चेहऱ्यावर रुमाल बांधलेला दिसून येतो.
पडेल कॅन्टीन येथे दुकाने फोडून चोरी; विजयदुर्ग पोलीसांकडून तपास सुरु












