सावंतवाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने पार पडलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीत आरोंदा हायस्कूल आरोंदाचा विद्यार्थी सार्थक संतोष राऊत याने 62% गुण संपादन करून शिष्यवृत्ती जिल्ह्याच्या ग्रामीण गुणवत्ता यादीत 15वा क्रमांक व सावंतवाडी तालुका गुणवत्ता यादीत चौथा क्रमांक प्राप्त केला आहे. सदरील विद्यार्थ्याला प्रशालेचे अध्यापक श्रीकृष्ण गावडे, दिवाल्या वसावे, चंदन गोसावी, सुप्रिया कोरगावकर, भावना माजगावकर व ताराचंद राठोड या शिक्षकांनी मार्गदर्शन केले आहे. या विद्यार्थ्याच्या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सिद्धार्थ गोपाळ तांबे तसेच आरोंदा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संदेश परब व सचिव भाई देऊलकर व सर्व पदाधिकारी यांनी तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
सार्थक संतोष राऊत याने 62% गुण संपादन करून गुणवत्ता यादीत चौथा क्रमांक प्राप्त केला












