कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरातल्या श्री सिद्धिविनायक मित्रमंडळातर्फे २४ ते २६ जानेवारी दरम्यान उपजिल्हा रुग्णालयासमोर माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. मंगळवारी २४ तारखेला सकाळी ५ वा. श्री गणेशमूर्तीचे आगमन होणार आहे.
बुधवारी २५ तारखेला सकाळी ७ वा. पासून गणेशमूर्ती प्रतिष्ठापना व पूजा, सकाळी ८ वा. सत्यनारायण महापूजा, सकाळी १०.३० वा. महाआरती, तीर्थप्रसाद, दु. १ वा. महाप्रसाद, २.३० वा. पासून श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ जानवलीचे बुवा रवी राणे, श्री कोटेश्वर नवतरुण प्रासादिक भजन मंडळ हरकुळ बु. चे बुवा अभिषेक शिरसाट, प. पू. भालचंद्र प्रासादिक भजन मंडळ हळवलचे बुवा भास्कर गावडे, श्री मेजारेश्वर प्रासादिक भजन मंडळ नागवेचे बुवा अमेय आर्डेकर, श्री राधाकृष्ण प्रासादिक भजन मंडळ जानवलीचे बुवा उदय राणे यांचे भजन, श्री गांगेश्वर अनभवानी प्रासादिक भजन मंडळ डामरेचे बुवा चिन्मय सावंत यांची भजने, ८.३० वा. महाआरती, ९.३० वा. जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ, दांडेली- आरोस यांचा ‘शिव महाकाल’ हा प्रयोग सादर होणार आहे. गुरुवारी २६ तारखेला सायंकाळी ५ वा. सिंधुगर्जना ढोल पथकासह श्री गणरायाची विसर्जन मिरवणूक निघणार आहे.