केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांची ग्वाही
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई उपनगरात लाखो प्रवासी कोकणातील असुन, त्यांना आपल्या गावी जाण्यासाठी दादर/ दिवा किंवा मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जावं लागतं, प्रवाशांना अतिशय नाहक त्रास सहन करावा लागतो, उपनगर प्रवाशांची कोकणासाठी रेल्वे सुरू करावी अशी गेल्या कित्येक वर्षांपासून प्रवाशांची मागणी होती,
उतर मुंबई चे नवनिर्वाचित खासदार व केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्या चारकोप मधिल जनता दरबारात कोकण मुंबई सामाजिक सेवा प्रतिष्ठान च्या वतीने निवेदन देण्यात आले, यावेळी आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मक मंडळ, रत्नागिरी जिल्हा मंडळ, रायगड जिल्हा एकात्मता ट्रस्ट,
या संस्थांनी आतापर्यंत रेल्वे प्रशासनाशी केलेला पत्रव्यवहार सोबत जोडण्यात आले, लोकसभेच्या निवडणुकीत मा पीयुष गोयल यांना कोकणवासीयांच्या वतीने विनंती करण्यात आली होती,बोरीवली वरुन गौरी-गणपती च्या सणाला या सेवेचा लाभ मुंबई उपनगरातील कोकण वासीयांना निश्चित मिळेल अशी ग्वाही मा पीयुष गोयल यांच्या वतीने प्रतिष्ठानच्या शिष्टमंडळाला देण्यात आली.
यावेळी या कामी विशेष सहकार्य करणारे आमदार योगेश सागर, जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर,नगरसेवक बाळा तावडे, प्रतिष्ठान चे अध्यक्ष योगेश पडवळ, सेक्रेटरी सुरेंद्र नारकर, खजिनदार प्रमोद गुजर, महेश माणगांवकर रेश्मा टक्के, प्रमोद घाग, रुपाली चाळके, संतोष जाधव, श्रध्दा नारकर, सुलभा जोशी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.












