तळेरे (प्रतिनिधी) : जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा वारगाव नं.१, शाळा वारगाव नं.२ आणि शाळा नं.३ मधील गरीब, होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना बेस्ट शिव-हनुमान मंदिर ट्रस्ट मुंबई यांचे कडून वारगावचे सुपुत्र कृष्णराज जानकी रामचंद्र कानकेकर यांनी आपल्या गावच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन मोफत वह्या, दप्तर या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
प्राथमिक शाळेमध्ये वाटप करतांना वारगाव गावचे उपसरपंच नाना शेटये, तंटामुक्ती अध्यक्ष राजा जाधव, राजाराम बोभाटे, विलास तळेकर, चंद्रकांत कानकेकर तसेच तिन्ही शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. त्याचप्रमाणे शेठ म.वि. केसरकर माध्यमिक विद्यालय वारगाव हायस्कूलमध्येही वह्या व गरीब होतकरू विद्यार्थ्यांना दप्तराचे मोफत वाटप करण्यात आले.मराठी शाळेत एकूण ७६ विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. तसेच हायस्कूलमध्ये ७७ विद्यार्थ्यांना वह्या व २० विद्यार्थ्यांना दप्तराचे मोफत वाटप करण्यात आले.












