वैभववाडी (प्रतिनिधी) : काल पासून पावसामुळे सर्व तळकोकणात, पूरसदृश्य परिस्थिती झालेली दिसत आहे. कुडाळ,सावंतवाडी,वेंगुर्ले येथील,सर्व नद्यांनी आपली धोक्याची पट्टी सोडली आहे.नागरिक वस्तीत,पुराचे पाणी घुसले आहे.नदीवरील रस्त्यात, वाहने अडकली आहेत.स्वतःआमदार वैभव नाईक हे नागरिकाचे मदतीला धावून गेले आहेत.उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख,युवा सेना प्रमुख तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी धरणे,घाट पाहणी करत आहेत,शासन दरबारी ,लोकांचे पूरग्रस्त संकटातून, सुटके साठी रेटाने प्रयत्न करीत आहेत.परंतु, कोकणातील,सत्ताधारी महायुतीचे मंत्री दीपक केसरकर व नेते राजन तेली हे अंतर्गत सत्तास्पर्धेमुळे ग्रस्त झालेले आहेत.माध्यमातून एकमेकावर सारखी चिखलफेक करत आहेत.आणि खरतर,असा संकटसमयी नागरिकांना दिलासा देण्यासाठी,त्यांनी आपले ” वाणी ” ला विराम द्यायला पाहिजे.पण तसे न करता,ते महायुतीचा धर्म सोडा,पण साध्या माणुसकीचा धर्म,ही पाळताना दिसत नाही.हे आता,तळकोकणात जनता उघड डोळ्यांनी पाहत आहेत.अशी टीका,”हकालपट्टी” प्रकरणी,उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संदीप सरवणकर यांनी केली.
मुसळधार पावसाने सिंधुदुर्गात पूरसदृश्य स्थिती असताना, महायुतीचे राजकारणी एकमेकाची “हकालपट्टी” करण्यात दंग – संदीप सरवणकर












