हलक्या वाहनांची वाहतूक सुरू राहणार
कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट रस्त्यात मोरीवरील पाईप खचून मोठा खड्डा निर्माण झाला आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असून फोंडाघाटमार्गे अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी केवळ हलक्या वाहनांची एकेरी वाहतूक सुरू ठेवावी. जेणे करून रस्त्याची दुरुस्ती करून रस्ता वाहतूक योग्य बनवता येईल अशी विनंती पिडब्ल्यूडी कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांना केली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी पत्रात कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी म्हटले आहे की फोंडाघाट रस्त्यात किमी 61 / 700 रस्त्यात मोरीवरील पाईप खचून मोठा खड्डा निर्माण झाला आहे. यावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू ठेवल्यास अपघाताची शक्यता आहे.तसेच रस्ता दुरुस्ती करणे शक्य होणार नाही. केवळ हलक्या वाहनांची एकेरी वाहतूक सुरू ठेवावी अशी विनंती करण्यात आली आहे.












