आचरा ग्रा.प. सदस्य अनुष्का गांवकर यांची तत्परता…!

खारलँड अधिकाऱ्यांकडून शिवापूर बंधाऱ्यांची पाहणी

30 मिटर बंधारा तात्काळ बांधण्याची खारलँड अधिकाऱ्यांनची ग्वाही

आचरा (प्रतिनिधी) : आचरा येथे सोमवारी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने हिर्लेवाडी येथील शिवापूर बंधारा वाहून गेला आहे. यामुळे येथील शिवापूर सोसायटीच्या भातशेती, माडबागायतीचे मोठे नुकसान होणार होते.

याबाबत माहिती समजताच ग्रामपंचायत सदस्य आणि उबाठा विभाग प्रमुख अनुष्का गांवकर यांनी तातडीने खारलँड विभागाशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. याबाबत मंगळवारी दुपारी खारलॅडचे उपकार्यकारी अभियंता अनिल जाधव, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संजय तांबे आदींनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ स्वरूपात 30 मीटर लांबीचा बंधारा बांधून देण्याची ग्वाही दिली.

यावेळी शिवापूर सोसायटीचे चेअरमन संदिप तांडेल, विनोद मुणगेकर, आबा मुणगेकर, बाबल पाटकर, गिरीधर पेडणेकर, बाबू पाटकर शैलेश मुणगेकर, मंगेश पाटकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!