महिलांची थायरॉईड, ईसीजी तपासणी फक्त 199 रुपयांत
कणकवली (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त माधवबाग च्या वतीने महिलांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून 1 हजार रुपये खर्च असणारी थायरॉईड आणि ईसीजी तपासणी महिलांसाठी केवळ 199 रुपयांत केली जाणार आहे. 9 मार्च ते 10 मार्च दरम्यान सकाळी 10 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत माधवबाग च्या कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी केंद्रावर हि तपासणी करण्यात येणार आहे. हृदयाचे ठोके वाढणे, अति प्रमाणात वजन वाढ, वजन कमी होणे, थकवा, कोरडी त्वचा, अति प्रमाणात घाम, मासिक पाळीमध्ये अनियमितता, गळ्याखालच्या बाजूला सूज किंवा उंचवटा, डोळे फुगीर दिसणे,केस गळणे, लैंगिक क्षमतेवर परिणाम अशी लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी या विशेष शिबिरात केली जाणार आहे. यासाठी आगाऊ नोंदणी आवश्यक असून कणकवली मोबाईल नं 9373183888 , कुडाळ मोबाईल नं 9011328581 , सावंतवाडी मोबाईल नं 7774028185 येथे नोंदणी करावी असे आवाहन माधवबाग च्या वतीने करण्यात आले आहे.