खारेपाटण (प्रतिनिधी) : अनुभव शिक्षा केंद्र मार्फत दि. ०५ मार्च २०२३ रोजी खारेपाटण बौद्ध विहार येथे क्षमता बांधणी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशिक्षक सहदेव पाटकर, अनुभव साथी राहुल कांबळे उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे एक नवीन गट बांधणी खारेपाटण येथे करण्यात आली. एकूण २० युवक-युवती उपस्थित होते. अनुभव हे युवक विकास आणि युवकांमार्फत विकास हा उद्देश ठेऊन मुल्ये आधारित समाज घडविण्याचा प्रयत्न करत असते. हि युवकांचीच युवकांसाठी सुरु केलेली प्रक्रिया आहे.
कार्यशाळेची सुरुवात सर्वांच्या ओळखीने झाले. या नंतर सहदेव पाटकर यांनी लीडरशीप आणि क्रिटीकल थिंकिंग या विषयावर विविध एक्तीव्हीटीच्या माध्यमातून युवकांसमोर मांडले. सध्याची परिस्थिती आणि युवकांनी यामध्ये सहभाग दाखविला तर कशा पद्धतीने समाज बदल घडू शकतो हे दर्शविण्यात आले. यावेळी लीडरशिप, धर्मनिरपेक्षता या संदर्भात व्हिडीयो दाखविण्यात आल्या. साथी राहुल कांबळे यांनी संविधान प्रास्तविका याचा अर्थ सांगितला. गट निर्माण करून यामध्ये प्रत्येक शब्दाचा अर्थ उलगडण्यात आला. कार्यशाळेच्या शेवटी सर्वांचे feedback जाणून घेतले. लोकशाही पाठशाला या मार्फत चालविलेले online सेशन मध्ये सर्व युवक सहभागी झाले.