सरपंच भाई आंबेलकर यांच्या उपस्थितीत सुरेश कदम यांच्या हस्ते जलजीवन मिशन कामाचा शुभारंभ
कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून जलजीवन मिशन अंतर्गत तिवरे गावात 85 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. तिवरे गावचे सरपंच रविंद्र उर्फ भाई आंबेलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरेश कदम यांच्या हस्ते जलजीवन मिशन कामाचा शुभारंभ आज करण्यात आला.
जलजीवन मिशन मुळे तिवरे गावात प्रत्येक कुटुंबाला मुबलक स्वच्छ पाणी उपलब्ध होणार आहे. यावेळी उपसरपंच रामचंद्र वाळवे तसेच ग्रामपंचायत सदस्य सुजाता गुरव निलेश परब राजू चव्हाण ग्रामपंचायत कर्मचारी निलेश चव्हाण किशोर देसाई यांच्यासह शंकर राणे, रमेश गोसावी, चंद्रकांत कदम संजय कदम वैभव महाडेश्वर देवेंद्र तेली प्रणय गुरव सुभाष गुरव अशोक परब संतोष वाळवे योगेश चव्हाण व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.