कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील असलदे येथील श्री. देव रामेश्वर मंदिर व डामरेवाडी श्री साई मंदिरतील दानपेटी फोडत चोरट्याने चोरी केली. त्याचबरोबर असलदे गावठाण येथील प्राथमिक शाळांच्या वर्ग खोल्या फोडून कपाट उचकटून चोरीचा प्रयत्न चोरट्याने केला आहे. घटनास्थळी थोड्याच वेळात पोलीस दाखल होणार आहेत.
दरम्यान,शाळेतील शिक्षक व विद्यार्थी शाळेत आल्याने दरवाजा,कपाटे फोडलेल्या अवस्थेत दिसली.त्यामुळे चोरी लक्षात आली आहे.विशेष म्हणजे चोरट्यांनी शाळेच्या एका वर्ग खोलीत मद्य पिऊन बॉटल त्याच ठिकाणी टाकली आहे.मंदिर व शाळांमध्ये चोरी झाल्याचे वृत्त समजताच घटनास्थळी असलेले सरपंच चंद्रकांत डामरे, उपसरपंच सचिन परब,तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबाजी शिंदे,पोलीस पाटील सावित्री पाताडे,ग्रामपंचायत सदस्य आनंद घाडी,अनिल नरे, मेहुल घाडी,श्यामु परब यांच्यासह ग्रामस्थ दाखल झाले आहेत.