वेंगुर्ले (प्रतिनिधी) : दरवर्षी भाजपा च्या वतिने चांदेरकर महाराज विठ्ठल मंदिरात वारकरी संप्रदायातील मंडळींचा सन्मान केला जातो . ह्यावर्षीही आषाढी एकादशीनिमित्त दहा जेष्ठ वारकऱ्यांचा सन्मान भाजपा प्रदेश का.का.सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. सर्वप्रथम ह.भ.प.सावळाराम कुर्ले महाराजांचा सन्मान करण्यात आला व त्यानंतर भाजपा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते जेष्ठ वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी वारकरी मंडळींना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देताना जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई म्हणाले की राज्य सरकारने दिंड्यांसाठी २०,००० रु चे अनुदान मंजुर केले आहे . तसेच महायुती सरकार ने वारकऱ्यांसाठी ” मुख्यमंत्री वारकरी महामंडळ ” स्थापन केले असुन या मार्फत तीर्थक्षेत्राचा विकास, कीर्तनकार, वारकऱ्यांना अन्न, सुरक्षा, वैद्यकीय मदत, विमाकवच ,पायाभूत सुविधा इत्यादी सुविधा या महामंडळामार्फत पुरविल्या जाणार आहेत. तसेच पायी वारी करणाऱ्या जेष्ठ वारकऱ्यांना शासनाकडून पेन्शन मिळणार असल्याचे सांगीतले. तसेच राज्यातील त्याचबरोबर देशातील प्रमुख तीर्थस्थळांचे दर्शन जेष्ठ नागरिकांना घेता यावे याकरीता प्रती व्यक्ती ३०,००० रुपये इतका प्रवास खर्च शासनाकडून दिला जाणार आहे . त्यामुळे हरिभक्तांची वारी सुखद करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे सांगितले.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्षा अँड. सुषमा खानोलकर, मा.नगराध्यक्ष राजन गिरप, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, जि.का.का.सदस्य वसंत तांडेल, महीला मोर्चा अध्यक्षा सुजाता पडवळ, महीला मोर्चा जि.उपाध्यक्षा वृंदा गवंडळकर, महीला मोर्चा शहर अध्यक्षा श्रेया मयेकर, नगरसेवक प्रशांत आपटे, बुथ प्रमुख रविंद्र शिरसाठ व पुंडलिक हळदणकर व निलेश गवस, किसान मोर्चाचे सत्यवान पालव तसेच बहुसंख्य वारकरी संप्रदायातील मंडळी उपस्थित होती.