सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : गेले काही महिने रिक्त असलेल्या एसटी विभाग नियंत्रक पदी अभिजित बजरंग पाटील यांची बढतीने नियुक्ती करण्यात आली आहे.मागील काही महिने सिंधुदुर्ग एसटी विभाग नियंत्रक पद रिक्त होते. प्रभारी अधिकारी डिसी पदाचा कार्यभार सांभाळत होते. एसटी चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी 6 मार्च रोजी काढलेल्या आदेशानुसार सध्या एसटी मध्यवर्ती कार्यालयात मालवाहतूक कक्षात विभागीय वाहतूक अधिकारी पदी कार्यरत असलेले अभिजित पाटील यांना हंगामी बढती देत सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक पदी नियुक्ती देण्यात आली आहे.