बेळगाव मधील युवकाला अटक ; कार जप्त
सावंतवाडी (प्रतिनिधी) : बेकायदा गोवा बनावटीची दारु वाहतूक केल्याप्रकरणी आंबोली पोलिसांनी बेळगाव येथील एकाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई आज सकाळी करण्यात आली. यात १ लाख ८ हजाराच्या दारुसह ४ लाखाची गाडी, असा मिळून तब्बल ५ लाख ८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कलमेश अल्लाप्पा मुलाबट्टी (वय ३६) रा. अलाब असे त्याचे नाव आहे. ही कारवाई आंबोली तपासणी नाक्यावर करण्यात आली.