पाऊस आला धावून भटवाडीचा रस्ता गेला वाहून

चिंदर सडेवाडी ते चिंदर चर्च रस्ता वाहतुकीस धोकादायक

चिंदर (विवेक परब) : चिंदर सडेवाडी ते चिंदर चर्च येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे काम ठेकेदारा कडून मे 2024 मध्ये चालू करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी मोरीची कामे जून महिन्यात भर पावसात ठेकेदाराने पूर्ण करून घेतली आहेत. भर पावसात काम करताना झालेल्या चिखलात खडी टाकण्यात आली.

काल चिंदर परिसरात झालेल्या ढग फुटी सदृश पावसाने याच रस्त्यावरील चिंदर भटवाडी येथील रस्त्यावरील माती, खडी शेतात वाहून गेली असून शेतीचे तर नुकसान झालेच आहे. पण रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले असून दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी वाहने चालकांना कसरत करत चालवावी लागत असून ठेकेदाराने तात्काळ रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी सर्व सामान्य जनतेतून केली जात आहे.

error: Content is protected !!