लिलाविश फाउंडेशन कडून कासार्डे विद्यालयात शिष्यवृत्तीचे वाटप
कणकवली (प्रतिनिधी) : भविष्यात काहितरी करायचे आहे हिच इच्छा महत्वाची आहे. त्यासाठी लागणार्या नियोजनात वेळेनुसार बदल होत जातो. मात्र, अशा प्राथमिक शिक्षणासाठी कोणालाही अडचण येऊ नये यासाठी लिलाविश फाउंडेशन नेहमीच प्रयत्न करत राहिल, असे प्रतिपादन लीलाविश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेश नारकर यांनी केले.
कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रमात बोलत होते. यावेळी संस्था पदाधिकारी प्रभाकर कुडतरकर, प्रशालेचे मुख्याध्यापक एम. डी. खाडये आदी उपस्थित होते. लीलाविश फाउंडेशनकडून दरवर्षी 50 गरिब होतकरू विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5 हजार प्रमाणे एकुण अडिज लाखाची शिष्यवृत्ती दिली जाते.
या शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांशी ओळख, त्यांची भविष्यातील स्वप्ने आणि फाउंडेशनकडून असलेल्या अपेक्षा हे जाणून घेण्यासाठी या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रास्ताविक करताना एम. डी. खाडये यांनी लीलाविश फाउंडेशनच्या शिष्यवृत्ती देण्यामागील संकल्पना स्पष्ट केली. तसेच, ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणासाठी देण्यात येणार्या या शिष्यवृत्तीच्या रकमेचा विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणासाठी करायचा आहे, असे आवाहन केले.
यावेळी प्रभाकर कुडतरकर मनोगत व्यक्त केले. दरम्यान उपस्थित सर्व विद्यार्थ्यांची ओळख आणि भविष्यात काय बनायचे आहे? याबाबत माहिती घेण्यात आली.