कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई गोवा महामार्गावर जाणवली येथे कृष्णा नगरी नजीकच्या वळणावर मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी इर्टिगा कार पलटी झाली. हा अपघात रविवारी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास झाला. मात्र अपघाताबाबत अधिक माहिती समजू शकली नाही. परंतु अपघातात करच्या दर्शनी व मागील भागाचे मोठे नुकसान झाले
मुंबई – गोवा महामार्गावर जाणवली येथे इर्टिगा कार पलटी हाेऊन अपघात











