मसूरे देऊळवाडा शाळेच्या छपराचे नुकसान !

मसूरे (प्रतिनिधी) : सोमवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे मसूरे देऊळवाडा प्राथमिक शाळेच्या हॉलच्या छपराचे सुमारे पंधरा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये पन्नास कोने पन्नास कौले, काही वासे असे नुकसान झाले आहे. तलाठी श्री साईनाथ लखमोड, उपसरपंच नरेंद्र सावंत,मुख्याध्यापक प्रशांत पारकर, प्रकाश लाकम, मोहन परब, यांच्या उपस्थितीत पंचयादी करण्यात आली. यावेळी शिक्षक गुरुनाथ ताम्हणकर, तेजल ताम्हणकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!