आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर भटवाडी येथील रहिवासी उर्मिला सीताराम गोगटे यांचे सोमवार दि. 22 जुलै रोजी रहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले त्या 80 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चता दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. आई माऊली इलेक्ट्रिकल आचराचे मालक, चिंदर सेवा संघाचे खजिनदार गणेश गोगटे यांच्या त्या आजी होत.