मसूरे (प्रतिनिधी) : गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व असतं. दातृत्व भावना ही आपलं जीवन सार्थकी लावण्यांचा मार्ग शिकवते. आपण जन्माला आलो की आपणाला पहिले गुरू भेटतात ते आपले आई वडील ,त्यानंतर आपले शिक्षक आपली शैक्षणिक परीक्रमा पूर्ण होऊनआपण एका उच्च विचार सारणीने आपल्या तारुण्याचा जीवनामधला आनंद घेत असतो. प्रपंच करत असताना परमार्थाची कास धरावी. त्यासाठी आपल्याला गुरुची गरज असते.आणि तेच असतात जीवनातले आध्यात्मिक गुरु. अध्यात्मिक गुरु आपणाला चांगल्या वळणावर नेतात व शेवटच्या क्षणापर्यंत आपणाला मायेने व ममतेने वात्सल्याने ,दिव्यत्वाचा संदेश देत असतात. आपणाला परमेश्वराची ओळख करून देऊन या परमेश्वराचं खरं रूप दाखवितात. आपणाला आत्मपरीक्षण करून देऊन यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवितात ते खरे सद्गुरु असतात. समाजाची सेवा हाच समाज रुपी परमेश्वर आहे. असे प्रतिपादन श्री श्री 108 महंत प पू. गावडेकाका महाराज यांनी कुडाळ माड्याचीवाडी येथे केले.
गुरुपौर्णिमेच्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या वेळी मन ही एक अद्भुत शक्ती या कार्यक्रमात सहभागी होऊन दहावी व बारावीच्या परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यासोबत योगशिक्षकांचाही सन्मान करण्यात आला .विशेष गुणगौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्यात दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावलेली कुमारी अर्पिता अमेय सामंत हिला सन्मानित करण्यात आलं. प्रभाकर तुकाराम गावडे (मुंबई ) (मुंबई)मंगलदास शंभू गाड (गोवा) ,श्रीमती स्मिता वासुदेव आंबेस्कर (सावंतवाडी)श्रीमती सुमन मधुसूदन किनळेकर (सावंतवाडी) श्रीमती सरोजिनी दशरथ गावडे (माड्याची वाडी) ,श्रीमती ,सुनंदा आबा कोरगावकर (गोवा) ,श्रीमती शुभांगी दिगंबर पोयरेकर(मसदे), बापू लक्ष्मण पाटकर (मसदे)या सर्वांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सौ केसर गोविंद वानिवडेकर (कुडाळ),सौ रश्मी हर्षल डिचोलकर , (दिवा)यांना वासल्य माय या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सद्गुरूंच्या भक्तिमार्गात उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल मंगेश परशुराम बिरजे (बेळगांव) श्रीमती ज्योती प्रकाश पाटील (बेळगाव), सोनू सुरेश धावडे (मुंबई),दीपिका विलास मोरजकर (कणकवली), सौ.रक्षाली देवानंद कवळेकर (गोवा)या सर्वांना परमपूज्य सद्गुरु श्री गावडे काका महाराजांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमात श्री सद्गुरु संगीत विद्यालय सावंतवाडीच्याा कलाकारांनी भक्ती गीतातून रंगत आणली. यावेळी भक्त सेवान्यास सर्व पदाधिकारी, सेवेकरी उपस्थित होते.

