सी एच ओ नियुक्ती मध्ये स्थानिक महिला उमेदवारांची गैरसोय तर परजिल्ह्यातील उमेदवारांवर मेहेरबानी

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या कारभारावर माजी सभापती अरविंद रावराणे यांचा संताप

सोयीच्या नियुक्तीसाठी आर्थिक व्यवहार झाल्याचा केला आरोप

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील सी एच ओ अर्थात समुदाय आरोग्य अधिकारी पदांच्या आज नियुक्त्या करण्यात आल्या. या नियुक्त्या करताना स्थानिक महिला उमेदवाराना अन्य पर्याय उपलब्ध असतानाही गैरसोयीचे ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे. याबाबत विनंती करूनही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांनी स्थानिक महिला उमेदवाराची गैरसोय करत परजिल्ह्यातील उमेदवारावर मेहरबानी करून त्यांची सोय केल्याचा आरोप माजी सभापती अरविंद रावराणे यांनी केला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांच्या या मनमानी कारभाराविरोधात लवकरच लोकशाही मार्गाने आवाज उठविणार असल्याचेही रावराणे यांनी सांगितले. तसेच परजिल्ह्यातील सी एच ओ पदी उमेदवारांना वैभववाडी तालुक्यातील त्यांना सोयीस्कर ठरणाऱ्या ठिकाणी नियुक्ती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून आर्थिक व्यवहार झाल्याचाही आरोप अरविंद रावराणे यांनी केला आहे. याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात रावराणे यांनी म्हटले आहे की वैभववाडी तालुक्यातील सिएचओ पदासाठी पात्र उमेदवारांना आज नियुक्ती देण्यात आली. कुंभवडे, सांगूळवाडी, लोरे नं 2, कुर्ली आदी गावात या नियुक्त्या देण्यात आल्या. सिएचओ पदासाठी एका स्थानिक पात्र ठरलेल्या महिला उमेदवाराने सहानुभूतीपूर्वक विचार करून कुंभवडे अथवा लोरे नं 2 या ठिकाणी नियुक्ती देण्याची विनंती केली होती. मात्र त्याठिकाणी परजिल्ह्यातील उमेदवारांना नियुक्ती देत जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून आर्थिक हित साधण्यात आले आहे. मुळातच वैभववाडी तालुका हा अतिग्रामिण असल्यामुळे या भागात परजिल्ह्यातील उमेदवार हे केवळ पाट्या टाकण्याचे काम करतात. आणि अति ग्रामीण भाग असल्याने वरचेवर दांड्या मारणे, कार्यालयीन वेळेत शासकीय मिटिंग ची कारणे देत आपल्या गावी जात असतात.याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्य व्यवस्थेवर होतो.

error: Content is protected !!