आंबेरी येथे ९ मार्च रोजी मोफत नेत्र तपासणी शिबीर आणि महिलांसाठी विविध कार्यक्रम

जागतिक महिलादिनानिमीत्त आंबेरी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजन

चौके (प्रतिनिधी) : 8 मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मालवण तालुक्यातील आंबेरी ग्रामपंचायतच्या वतीने गुरुवार दिनांक ९ मार्च रोजी सकाळी ९:३० ते १:३० या कालावधीत मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या बरोबरच ग्रामपंचायतीच्या वतीने सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नवदुर्गांचा सन्मान , महिलांसाठी ताण तणाव व आरोग्य मार्गदर्शन शिबिर तसेच महिलांचे विविध खेळ आणि खेळ पैठणीचा हा विशेष उपक्रम , विजेत्या महिलांना बक्षीस वितरण आणि सायंकाळी महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रम गुरुवारी दिवसभर आयोजित करण्यात आले आहेत. तरी आंबेरी गावातील सर्व महिलांनी या महिला विशेष उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आंबेरी सरपंच मनोज डिचोलकर, उपसरपंच रविंद्र परब आणि ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांनी केले आहे.

error: Content is protected !!