कळसुली ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रा.पं. सदस्य यांचे आयाेजन
कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली ग्रामपंचायत आयोजित सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सौजन्याने जागतिक महिला दिनाचे औचित साधून गावातील महिलांकरिता खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन बुधवार 8 मार्च ग्रामपंचायत कार्यालय येथे ठीक दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
प्रथम पारितोषिक (आकर्षक पैठणी ग्रामपंचायत सरपंच सचिन पारधीये पुरस्कृत),द्वितीय पारितोषिक आकर्षक सेमी पैठणी(ग्रामपंचायत सदस्य कल्पेश सुद्रिक पुरस्कृत) ,तृतीय पारितोषिक आकर्षक भेटवस्तू (ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दळवी),तसेच इतर आकर्षक बक्षिसे सामाजिक कार्यकर्ते श्री.सतीश तेली (सामाजिक कार्यकर्ते पुरस्कृत )तरी गावातील सर्व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कळसुली ग्रामपंचायत सरपंच सचिन पारधीये यांनी केल आहे.