कणकवली (प्रतिनिधी) : उत्कर्ष उपक्रमा अंतर्गत आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नवीन कुर्ली प्राथमिक शाळेच्या वतीने दिवसभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आज सकाळी १०:०० वाजता दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन होईल त्यानंतर स्वागतगीत,मान्यवरांचे स्वागत , शाळा व्यवस्थापन समिती यांस कडून पहिली ते सातवीच्या मुलांना टी-शर्ट वाटप, महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, दुपारी श्रीम. एकावडे मॅडम यांचे ‘उत्कर्षा’ उपक्रमा अंतर्गत मार्गदर्शन, सौ. जयश्री हरमलकर, श्री खोजुर्वेकर सर कुडाळ यांचे सॅनिटरी पॅड संदर्भात मार्गदर्शन, महिलांसाठी हळदीकुंकू असे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे
तरी सर्व पालक, ग्रामस्थ यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शाळा नवीन कुर्ली सर्व शिक्षक वृंद तसेच शाळेतील सर्व कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य यांनी केले आहे.