कळसुली-हर्डी बीएसएनएल टॉवर वारंवार बंद

टॉवर सुस्थितीत करण्याची कल्पेश सुद्रीक यांची मागणी..! ; नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कळसुली हर्डी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रा जवळील बीएसएनएल टॉवर वारंवार बंद होत असल्याने ग्रामपंचायत सदस्य कल्पेश सुद्रिक यांच्या उपस्थितीत उपमंडल अधिकारी योगेश भागवत यांना कळसुली गावांतील दोन्हीं बीएसएनएल टॉवर वारंवार बंद पडत असलेला टॉवर सुस्थितीत करण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.

कळसुली बीएसएनएल टॉवर बंद झाल्यावर कळसुली गावात बीएसएनएल व्यतिरिक्त कोणतेही नेटवर्क येत नसल्याने त्याचा फटका गावातील ग्रामपंचायत,तलाठी कार्यालय ,रेशन दुकान, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, बँक ,पोस्ट ,इत्यादींवर होत आहे.
कळसुली गावाची लोकसंख्या जवळपास 3,500 च्या आसपास असून या गावात बीएसएनएलचे दोन टॉवर असून 2 टॉवर वारंवार बंद होत असल्याने ग्रामस्थांमधून बीएसएनएलच्या सेवेबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

यावेळी माजी तंटामुक्ती अध्यक्ष चंदू परब, राष्ट्रवादी युवक जिल्हा सरचिटणीस रुजाय फर्नांडीस, मोहित सावंत, अक्षय मुरकर सह आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!