गावातील कर्तृत्ववान महिलांचा आणि मुलींचा करण्यात आला सन्मान
वैभववाडी (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिन आज ग्रामपंचायत लोरे नं 2 येथे मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.
यावेळी गावातील कर्तृत्ववान महिलांचा आणि मुलींचा सन्मान- सत्कार करण्यात आला महिलांसाठी विविध कार्यक्रम तसेच संगीत खुर्ची व इतर फणी गेम्स ठेवण्यात आले होते. तसेच गावातील अनेक महिलांनी गीत गायन करुन कार्यक्रमात सहभाग नोंदवला काहि मुलींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर पोवाडा सादर करून रंगत आणली यावेळी लहान मुलींच्या जन्माचे आकर्षक भेटवस्तू देवून स्वागत करण्यात आले. याकार्यक्रम प्रसंगी अनेक महिलांनी आपलं मनोगत व्यक्त करताना आपली ग्रामपंचायत महिलांसाठी विविध कार्यक्रम राबवत असल्याने ग्रामपंचायत आणि सरपंच यांचे कौतुक केले.
बाल क्रीडा महोत्सव सन 2022/23 मध्ये जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या ज्ञानी मी होणार या स्पर्धेत वैभववाडी तालुक्याला सर्वसाधारण विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे केंद्र शाळा लोरे हेळेवाडी शाळेचे तसेच खो खो स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षक यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक कदम सर तसेच उपसरपंच रुपेश पाचकुडे , मीथील नाचनेकर पल्लवी झीमाल अश्विनी मांडवकर उपस्थित होते.
यावेळी सरपंच यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सर्व महिलांनी छोटे छोटे उद्योग करून आपलं कुटुंबाची आर्थिक प्रगती करण्यासाठी आवाहन करून त्यासाठी लागणारे प्रशिक्षण ग्रामपंचायत वतीने राबविण्यात येतील असे स्पष्ट केले. आणि उपस्थित सर्वांचे आभार मानले यावेळी गावातील उपसरपंच रुपेश पाचकुडे नाना रावराणे दिगंबर रावराणे स्वागत रावराणे सुप्रिया रावराणे आणि ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.