जिल्हा,राज्याच्या जडणघडणीत महिलांचे फार माेठे याेगदान

धर्मादाय आयुक्त श्रीमती एस एस निकम यांचे प्रतिपादन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्याच्या आणि राज्याच्या जडणघडणीत महिलांचे मोठे योगदान आहे. त्या सक्षम असल्या तरच देशाची प्रगती झपाट्याने होणार आहे. त्यामुळे महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सर्वांगीण ज्ञान आत्मसात करा. तसेच आपल्या कर्तव्यांबरोबरच आरोग्य जपा. असे प्रतिपादन जिल्हा धर्मादाय आयुक्त श्रीमती एस एम निकम यांनी आज महिला दिन कार्यक्रमात केले

जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने आज ८ मार्च महिला दिन साजरा करण्यात आला. या अनुषंगाने महिला कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. तसेच कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा धर्मादाय आयुक्त एस एम निकम, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव दीपक म्हालटकर, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सिरस, जिल्हा पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा माधव, मार्गदर्शक निकिता म्हापनकर, सरकारी वकील वेदिका राहुल आदी उपस्थित होते.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने येथील नियोजन समिती सभागृहात महिला दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचा शुभारंभ थोर महिला सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, जिजाबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर जिल्हा रुग्णालय आरोग्य पथकामार्फत उपस्थित महिला अधिकारी कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. रक्ताचे नमुने घेऊन २७ प्रकारच्या तपासण्या यावेळी करण्यात आल्या.

आजच्या महिला दिन कार्यक्रमात कणकवली येथील निकिता म्हापनकर यांनी समान वेतन कायदा ,कारखाना कायदा, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा, प्रसुती सुविधा कायदा, गर्भपाता बाबतचा कायदा, या विषयावर उपस्थित महिला कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले तर वेदिका राऊळ यांनी कौटुंबिक कायदे ,फौजदारी कायदे याविषयी मार्गदर्शन केले. याव्यतिरिक्त जिल्हा धर्मादाय आयुक्त श्रीमती एस एम निकम, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव दीपक म्हालटकर यांनी उपस्थिताना कायदेविषयक मार्गदर्शन तसेच कायदे व त्याचा वापर याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी महसूल प्रशासनातील मोठ्या संख्येने महिला कर्मचारी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!