मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे पशुवैद्यकीय दवाखाना येथील पशुवैद्यकीय अधिकारी गेले कित्येक महिने कायमस्वरूपी न मिळाल्यामुळे येथील शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. सद्यस्थितीत पावसाळा सुरू असल्यामुळे जनावरांना विविध प्रकारचे आजार होत आहेत. आपल्या पशुना झालेले आजार बरे करण्यासाठी येथील शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. याबाबत संबंधित विभागास दूरध्वनीवरून संपर्क साधूनही अद्याप पर्यंत मसुरे येथे कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध नाही. येत्या चार दिवसात संबंधित कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी मसूरे येथे हजर न झाल्यास मसुरे भारतीय जनता पक्षाच्या वतीने संबंधित जिल्हा परिषद पशुवैद्यकीय अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा मालवण पंचायत समितीचे माजी सभापती छोटू ठाकूर, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर आणि शिवाजी परब यांनी दिला आहे. तसेच याबाबत माजी खासदार निलेश राणे यांच्याकडेही या खात्याच्या दुर्लक्षित कामाबाबत तक्रार करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.