जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी तीन विद्यार्थ्यांची निवड
आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुकास्तरीय शासकीय कॅरम स्पर्धेत जनता विद्या मंदिर त्रिंबक प्रशालेच्या 17 वर्षे वयोगट मुली मध्ये कु. तृप्ती राऊळ हिने प्रथम क्रमांक, 14 वर्षे वयोगट कॅरम स्पर्धेत कु. अनन्या त्रिंबककर हिने प्रथम क्रमांक तर कु. शमिका पवार द्वितीय क्रमांक प्राप्त केला या तीन ही विद्यार्थ्यांची ओरोस येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल संस्थाध्यक्ष सुरेंद्र (अन्ना) सकपाळ, कार्यवाह अरविंद घाडी, मुख्याध्यापक प्रवीण घाडीगावकर, क्रीडा शिक्षक महेंद्र वारंग, सर्व संचालक, शिक्षक, पालक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.











