शिवसेना आचरा विभागाची बैठक संपन्न !

पक्ष निरीक्षक बाळा चिंदरकर, दीपक वेतकर व राजेंद्र फाटक यांची प्रमुख उपस्थिती

आचरा (प्रतिनिधी) : आचरा जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना विभागाची बैठक आचरा डिफोडील रिसॉर्ट येथे नुकतीच संपन्न झाली. बैठकीला उपस्थित पक्ष निरीक्षक बाळा चिंदरकर, दीपक वेतकर व राजेंद्र फाटक या तिन्ही मान्यवरांचा सत्कार अनुक्रमे तालुका प्रमुख महेश राणे, आचरा विभाग प्रमुख चंद्रकांत गोलतकर, उपविभाग प्रमुख अश्विन हळदणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आजच्या दिवसातील ही सर्वात मोठी बैठक होती. यावेळी उपस्थित मान्यवर विधानसभा क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, बाळा चिंदरकर, दीपक वेतकर, राजेंद्र फाटक यांनी उपस्थित शिवसैनिकाना मार्गदर्शन केले.

बाळा चिंदरकर यांनी संघटना मजबूत करा, आपण तुमच्या पाठीशी आहोत असे आवाहन केले. दिपक वेतेकर यांनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांचे कौतुक करत विधानसभा सभेच्या तयारीला लागा आम्ही तुमच्या सोबत आहोत असे मार्गदर्शन केले. राजेंद्र फाटक यांनी तन मन धन अर्पूण एक जुटीने काम करा आणि कुडाळ मालवण विधानसभेवर भगवा फडकण्यासाठी कामाला लागा असे आवाहन उपस्थितांना केले. तालुकाध्यक्ष महेश राणे यांचा वाढदिवस असल्याने त्यांना सर्वांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी, उप.जिल्हा प्रमुख विश्वास गांवकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, मालवण तालुका प्रमुख महेश राणे, मालवण तालुका प्रमुख राजा गांवकर, प्रवक्ते आशिष नाबर, युवासेना जिल्हा प्रमुख ऋत्विक सामंत, युवती सेना जिल्हा प्रमुख सोनाली पाटकर, युवासेना सोशल मीडिया जिल्हा प्रमुख हर्षद पारकर, उप.तालुका प्रमुख पराग खोत, युवा उद्योजक मेहुल, गौरव मालंडकर, उमेश साटम, ओकार मुळये, प्रणव राणे, इशान आजगावकर, विनोद भावे, प्रविण परब, जितेंद्र घाडी, महेद्र घाडी, वासुदेव घाडी, प्रफुल्ल घाडी, अनिल माने, चंद्रकांत कदम, प्रविण परब, उमेश सावंत, अमर पळसंबकर, रोहन धुरी, प्रसाद घाडी, अभिनव बिडये, उदय घाडी, नितिन घाडी, प्रकाश राणे, विनायक कोळबकर, सदानंद पाटील, हेमंत पडवळ, प्रांजल पडवळ, हर्षदा वाळवे, तेजस वाळवे, गुरुप्रसाद मयेकर, दत्ताराम वाळवे, समीर मुणगेकर, अशोक वाळवे, संतोष घाडी, श्लोक घाडी, भरत खिरूळकर, पळसंब शाखा प्रमुख विवेक पुजारे, युवा शाखा प्रमुख मनीष पुजारे, बुथ प्रमुख प्रसाद पुजारे, शिवदुत रामकृष्ण पुजारे, नितिन सावंत, विघ्नेश सावंत, दाजी जुवेकर, विभागातील पुरुष, युवा, महिलां आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!