वैभववाडीत विविध उपक्रमांनी स्वातंत्र्य दिन साजरा

जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांची क्रांतिकारकांची वेशभूषा ठरली आकर्षण

वैभववाडी (प्रतिनिधी) : ७८ वा भारतीय स्वातंत्र्य दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. वैभववाडी येथे अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी येथे स्वातंत्र्य दिन दिमाखात साजरा करण्यात आला. वाय.जी.चव्हाण व एस.ए.सबनिस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, राज्य गीत, ध्वज गीत गायन केले.संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. प्रशालेतील एन.सी.सी छात्रांचे संचलन यावेळी पार पडले. तसेच सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी कवायत प्रकारांचे प्रात्यक्षिक सादर केले. शिवाय प्रशालेच्या काही विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्य सैनिक, थोर हुतात्म्यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील सहभागा बद्दल उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली.

यावेळी जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी केलेली भगतसिंग, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक आदी क्रांतिकारकांची वेषभूषा उपस्थितांचे आकर्षण ठरली. शाळे बरोबरच तहसीलदार कार्यालय, बौद्ध विहार येथील ध्वजारोहण प्रसंगी विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली. शालेय परिसरा पासून दत्त मंदिर पर्यंत बाजारपेठेतून विविध घोषणा देत ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, संचालक शरद नारकर, विजय रावराणे, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, पी.एम.पाटील. एस.बी.शिंदे, माध्यमिक विभाग प्रमुख एस.एस.पाटील, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख पी.जे.सावंत, एन.सी.सी. ऑफिसर एस. टी. तुळसणकर, आर.एस.पी.अधिकारी एम.एस.चोरगे. आदी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!