शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांना संजय आग्रे यांनी ठाणे येथे दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : शिवसेना उपनेते आमदार रवींद्र फाटक यांच्या 15 ऑगस्ट या वाढदिवशी शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी ठाणे येथे सदिच्छा भेट घेत अभिष्टचिंतन केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख बापू धुरी उपस्थित होते. देवगड तालुक्यातील मिठबाव गावचे सुपुत्र असलेले आमदार रवींद्र फाटक यांचा वाढदिवस त्यांची कर्मभूमी ठाणे येथे मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा केला जातो. यावर्षीच्या आमदार रवींद्र फाटक यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. यावेळीही शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे हे उपस्थित होते.

error: Content is protected !!