चिंदर ग्रामपंचायतीच्यावतीने विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा संपन्न
आचरा (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद शाळांन मध्ये शिक्षण घेऊन मुलं आज देश पातळी वर नाव कमवत असून इंग्रजी माध्यमाकडे सध्या लोकांचा ओढा वाढलेला आहे. इंग्रजी माध्यम हि जरी काळाची गरज असली तरी आपल्या मुलांना मराठी माध्यमातूनच शिक्षण द्या असे प्रतिपादन चिंदर गावचे माजी सरपंच तथा विद्यमान भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी चिंदर ग्रामपंचायत आयोजित विद्यार्थी गुण गौरव सोहळ्यात केले.
सकाळी सरपंच नम्रता महंकाळ-पालकर यांच्या हस्ते ध्वजारोहनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी चिंदर भटवाडी शाळेच्या मुलांनी शिक्षक निशिगंधा वझे यांच्या मार्गदर्शना खाली समुह गाण आणि कवायत सादर केली. त्यानंतर जिल्हा परिषद शाळांनची मेरॉथॉन स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये तनुष खोत याने प्रथम, अर्पिता पेडणेकर हिने द्वितीय, हर्ष कानविंदे यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडलेल्या गुण गौरव सोहळ्याचे उदघाट्न मान्यवरंच्या हस्ते पार पडले. बिडिएस, एस टी एस तसेच दहावी, बारावी गुणवंतांचा सत्कार समारंभ यावेळी मान्यवरानच्या हस्ते पार पडला.
यावेळी उपसरपंच दिपक सुर्वे, ग्रामविकास अधिकारी मंगेश साळसकर, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गांवकर, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर, केदार परुळेकर, शशिकांत नाटेकर, रिया घागरे, जान्हवी घाडी, सानिका चिंदरकर, संतोष कोदे, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, व्हॉइस चेअरमन सुनिल पवार, केंद्र प्रमुख प्रसाद चिंदरकर, पोलीस पाटील दिनेश पाताडे, दिगंबर जाधव, संतोष अपराज, कविंद्र माळगावकर, रवी घागरे, छोटू साटम, किशोर खोत, महेंद्र कदम, शुभांगी लोकरे-खोत, भीमाशंकर शेतसंदी, उज्ज्वला पवार, स्मिता जोशी, नंदकुमार जुधळे, मैना कारंडे, गायकवाड, काळे, विश्राम माळगावकर, समिर अपराज, सिद्धेश नाटेकर, आरोग्य सेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषद शाळातील शिक्षक, विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य शशिकांत नाटेकर यांनी तर आभार महेंद्र मांजरेकर यांनी मानले.