खारेपाटण (प्रतिनिधी) : आपल्या माणसांच्या जीवनात व्यक्तीचा स्वतःचा देह आणि देव यांच्या बरोबरच देशाचे मोठे स्थान आहे. देशाचे सैनिक आपले संरक्षण करतात. देशातील निराधार वंचित देशबांधवांची सेवा करणे हे आपले मोठे कर्तव्य आहे.असे प्रतिपादन जीवन आनंद संस्थेतील जेष्ठ मार्गदर्शक नरेश चव्हाण यांनी विरारफाटा येथील स्वातंत्रदिन कार्यक्रमात बोलताना केले.
जीवन आनंद संस्थेच्या समर्थ आश्रम – विरारफाटा ता.वसई, संविता आश्रम – पणदूर ता.कुडाळ यांसह गोव्यातील संवेदना आणि माँ आसोरेघर आश्रमांत देशाचा ७८ वा भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. संविता आश्रम पणदूर येथे विजय भागवत (बेळगाव) यांच्या हस्ते व संस्थापक अध्यक्ष सदिप परब व विश्वस्त जितेंद्र परब यांच्या प्रमुख उपस्थीत ध्वजारोहण करण्यात आले. तर जीवन आनंद संस्था संचलित गोवा पर्रा येथील संवेदना आश्रम येथे प्रमुख पाहुणे व संस्थेचे हितचिंतक महेश स्वार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. भारतीय जैन सोशल ग्रुप आणि सहेली ग्रुप म्हापसा व संवेदना आश्रमातील भगिनी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. तसेच संस्थेच्या ओपा खांडेपार – फोंडा गोवि येथील माॅ आसरोघर आश्रमात ध्वारोहणाचा कार्यक्रम प्रमुख पाहुणे माननीय वासुदेव गुणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आश्रमातील बांधव व माॅ आसरोघर येथील कर्मचारी उपस्थित होते.