टेली मेडिसिन च्या सहकार्याने-वावळ्याचे भरड भराडी कला क्रीडा विकास मंडळाचे आयोजन
चौके (अमोल गोसावी) : जिल्हा परिषद आरोग्य विभाग सिंधुदुर्ग व न्यूरोसिनॅप्टिक कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच वावळ्याचे भरड भराडी कला क्रीडा विकास मंडळ यांच्यावतीने मंगळवारी चौके येथील भ.ता.चव्हाण,म.मा विद्यालय येथे घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिर तसेच नेत्र तपासणी शिबिरात चौके पंचक्रोशीतील ग्रामस्थानी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.यावेळी सुमारे 85 ग्रामस्थांनी या विविध तपासणीचा लाभ घेतला.
या आरोग्य शिबिरात उच्च रक्तदाब तपासणी, इजीसी, शरीरातील ऑक्सिजन तपासणी, शरीराचे तापमान मोजणे, त्वचारोग निदान, रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणी, गरोदरपणाची तपासणी, लघवीची तपासणी, गुप्तरोग संदर्भात तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, मलेरिया डेंग्यू निदान, रक्तातील कोलेस्ट्रॉल तपासणी अशा तपासण्या करण्यात आल्या. तसेच मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. याशिवाय विविध आजारावर टेली मेडिसिनद्वारे तज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य सल्ला व औषधे देण्यात आली.
या आरोग्य शिबिराचे उद्घाटन चौके वावळ्याचे भरड येथील ज्येष्ठ ग्रामस्थ नारायण काटकर, पुरुषोत्तम पाटणकर, मधुकर चौकेकर, बाळा परब, विष्णू चौकेकर,नारायण सावंत, विनायक गावडे यांच्यासह मालवण पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष गावडे ,चौके सरपंच गोपाळ चौकेकर,स्थानिक समिती अध्यक्ष बिजेंद्र गावडे,मंडळाचे अध्यक्ष दत्ता गावडे उपाध्यक्ष मोहन गावडे सचिव श्रीधर नाईक शंकर गावडे,शामसुंदर मेस्त्री व मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी या शिबिरासाठी टेली मेडिसिन प्रकल्प समन्वयक श्री सुमित सावंत, श्री सचिन पांचाळ,टेली मेडिसिनच्या सौ.अनशा गावडे सौ.मीरा तावडे – स्टाफ नर्स,कु.माया इन्सुलकर,श्रीकांत वेंगुर्लेकर-आरोग्य सेवक, दीपिका पुजारे रमेश जगदाळे नेत्र तपासणीस यांच्या विशेष सहकार्य लाभल्याने शिबीर यशस्वी झाले.