अखेर वाळू उत्खननास जिल्हा प्रशासनाकडून मिळणार परवाणगी

पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार निलेश राणे यांचा यशस्वी पाठपुरावा

कुडाळ (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील खाडीपात्रातील ज्या वाळूपट्ट्यात उत्खनन करण्यास बंदर विभाग व प्रशासनाने हिरवा कंदील दिला होता त्या वाळूपट्ट्यात वाळू उत्खनन करण्यास वाळू व्यवसायिकांनी २३ टेंडर अर्ज भरणा करत वाळू उत्खननास परवानगी मागणी केली होती . दरम्यान २३टेंडर अर्ज नामंजूरी देण्यात आली आहे. पैसे भरणा व अन्य प्रशासकीय कारवाई पूर्ण होताच पस परवानगीने वाळू उत्खनन लवकरच सुरु केले जाणार आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्र व त्यावर अवलंबून आलेल्या मजूर व अनेकांना दिलासा मिळणार आहे. अशी माहिती बाबा परब यांनी दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा वाळू संघटना जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक बाबा परब यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले,दरम्यान वाळू उत्खननास प्रशासकीय स्तरावरून लवकर परवाणगी मिळावी यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण व माजी खासदार निलेश राणे यांनी विशेष प्रयत्न केले असून त्यांच्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न निकाली लागला आहे.

error: Content is protected !!