राज्य मागासवर्ग आयोग सदस्य जानेवारी अखेरीस सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यमागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. संजीव सोनावणे, अॅङ बी. एल सगर किल्लारीकर ज्योतिराम चव्हाण हे बुधवार दि. 25 ते 30 जानेवारी 2023 या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार दि. 25 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 ते 1.30 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपविभागीय दंडाधिकारी व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक वैश्यवाणी या जात समुहाची जाहिर जनसुनावणी व आपल्या वेळी आलेल्या जात समुहांच्या संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा, घिसाडी, गाडी तोहार या समाजास जात प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणीविषयी जात प्रमाणपत्र निर्गमन अधिकाऱ्यांसोबत चर्चा व आढावा बैठक दुपारी 3 वाजता देवगड, जि. सिंधुदुर्गकडे रवाना व मुक्काम.

गुरुवार दि. 26 जानेवारी रोजी 11 ते 4 वाजेपर्यंत वैश्यवाणी या जात समुहाची जाहिर जनसुनावणी व आयत्या वेळी आलेल्या जात समुहांच्या संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने अबूवाल लेखन व मुक्काम. शुक्रवार दि. 27 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 4 आश्रमशाळा व शासकीय वसतिगृहे यांना भेट दिनांक 28 व 29 जानेवारी रोजी शासकीय कामकाज व दि. 29 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता वेंगुर्ले येथे आगमन व मुक्काम. सोमवार दि. 30 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 1.30 वाजता जिल्ह्यातील मच्छिमार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा. दुपारी 3 वाजता पुण्याकडे प्रयाण.

error: Content is protected !!