खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावच्या म.गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे युवा कार्यकर्ते प्रणय गुरसाळे यांची नुकतीच सर्वानुमते निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. खारेपाटण ग्रामपंचायतीची सर्वसधरण ग्रामसभा आज गुरवारी २२ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयात दुपारी ३.०० वाजता सरपंच प्राची ईसवलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर सभेमध्ये खारेपाटण गाव तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी भाजप पक्षाचे कार्यकर्ते प्रणय गुरसाळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर या समिती मध्ये गावातील सर्व स्तरातील घटकांना समाविष्ट करण्यात आले.
तसेच नवनिर्वाचित तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रणय गुरसाळे यांचा ग्रामपंचायत खारेपाटण तसेच भाजप पक्षाच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गावच्या सरपंच प्राची ईसवलकर, उपसरपंच महेंद्र गुरव, माजी पं.स.तृप्ती माळवदे, ग्रा.पं. सदस्य किरण कर्ले, जयदीप देसाई, गुरुप्रसाद शिंदे, सुधाकर ढेकणे मनाली होणाळे दक्षता सुतार, धनश्री ढेकणे, अस्ताली पवार, माजी सरपंच रमाकांत राऊत, किशोर माळवदे उपसरपंच इस्माईल मुकादम, भाजप शक्ती केंद्र प्रमुख सुधीर कुबल, भाऊ राणे, राजेंद्र वरूणकर, उज्ज्वला चिके, बाळा रोडी आदी मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.संपूर्ण सभेचे सूत्रसंचलन खारेपाटण ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी जी सी वेंगुर्लेकर यांनी केले.
