महाविकास आघाडीच्याच कार्यकर्त्यांचा करून घेतला बापर्डे येथे उबाठामध्ये पक्ष प्रवेश
देवगड (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बापार्डे मधील उबाठा च्या कार्यकर्त्यानी अलीकडेच केलेला भाजपमधील पक्षप्रवेश उबाठा युवा सेनेचे तालुकाप्रमुख फरीद काझी यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच आपल्याच गावातील झालेला पक्षप्रवेश सहन न झालेल्या फरीद काझी यांनी आपल्या पक्षश्रेष्ठींची मर्जी सांभाळण्यासाठी सचिन राणे व ब्रह्मजीत राणे या मूळच्या महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचा उबाठामध्ये प्रवेश करून घेत स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा फसवा केविलवाणा प्रयत्न केल्याची टीका केलेला प्रवेश हा केवळ फरीद काजी यांनी आपल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे अशी टीका पडेल मंडल उपाध्यक्ष अजित राणे यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे. मुळात सचिन राणे आणि ब्रह्मजीत राणे यांचा राणे समर्थकांशी आणि भाजपा पक्षाशी कोणताही संबंध नाही. आमदार नितेश राणे यांच्या कार्यप्रणालीमुळे बापर्डे गावात काही दिवसापूर्वी उबाठा सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात केलेला पक्षप्रवेश हा फरीद काझी यांच्या जिव्हारी लागल्यामुळे फरीद काझी यांनी आपल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी त्यांच्याच पक्षातील लोकांचा प्रवेश करून घेत स्टंटबाजी करत आहेत असे अजित राणे यांनी प्रसिद्धीपत्रकातून म्हटले आहे.