जनता विद्या मंदिर त्रिंबक हायस्कूल अव्वल
१७ वर्षे वयोगटातील मुली विजेत्या; सांगली येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत करणार सिंधुदुर्ग जिल्हाचे नेतृत्व
१४ वर्षे वयोगट मुली ठरल्या उपविजेत्या
आचरा (प्रतिनिधी) : बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला येथे पार पडलेल्या शासकीय जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत जनता विद्या मंदिर त्रिंबक हायस्कूलच्या १७ वर्षे वयोगटातील मुलीनी विजेतेपद पटकावले. सेमी फायनल मध्ये पाट हायस्कूल संघावर २-० ने एकतर्फी विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला. अंतिम सामना आचिर्णे हायस्कूल वैभववाडी व जनता विद्यामंदिर त्रिंबक संघामध्ये झाला अंतिम सामन्यातही अचिर्णे हायस्कूल संघावर २-० ने विजय मिळवत विजेते पदाला गवसणी घातली. याच बरोबर जनता विद्या मंदिर त्रिंबक हायस्कूलच्या १७ वर्षे वयोगटातील मुलींनी विभागीय स्पर्धेसाठी धडक मारली आहे. सांगली येथे होणाऱ्या विभागीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत जनता विद्या मंदिर त्रिंबक प्रशाला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे. जनता विद्या मध्ये त्रिंबक हायस्कूलच्या १४ वर्षे वयोगट मुलीनी या स्पर्धेत उपविजेते पद पटकावत द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. जिल्हास्तर शासकीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मिळालेल्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष सुरेंद्र उर्फ अन्ना सकपाळ, उपाध्यक्ष अशोक बागवे, कार्यवाह अरविंद घाडी, मुख्याध्यापक प्रवीण घाडीगावकर, सर्व शिक्षक, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक महेंद्र वारंग, संस्थाध्यक्ष सुरेंद्र उर्फ अन्ना सकपाळ यांचे मार्गदर्शन लाभले.